चंद्र
चंद्र
तुच चंद्र माझा, मी तुझीच चांदणी रे
तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे
स्वप्नापरी मज भासे सगळे
आहे सत्य की ,आभास हे खुळे
बदलुनी गेले, जग माझे सारे
तुजवीन ना येई,कोणता ध्यास मना रे
तुच चंद्र माझा ,मी तुझीच चांदणी रे
तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे
पाहीले, ना कधी, मला मी इतके
पाहीले, तुझ्या नजरेत, मला मी तितके
एक-एक श्वास, जगते आता नव्याने रे
शोधता अस्तित्व माझे,तुझ्यातच गवसते रे
तुच चंद्र माझा,मी तुझीच चांदणी रे
तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे
कसा चंद्र कस वय
कशी तुझी चांदणी सय
कसा निघेल इथूनी पाय
वेड लागेल नाहींतर काय
तुच चंद्र माझा,मी तुझीच चांदणी रे
तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे
रूप तुझे स्मरता नभी चांदणे सजते
चंद्र हसरा येतो अन आभाळही नटते
येशील का तू सांग यकदा
तुजवीण जगणे अधुरे वाटे

