चंद्र रोजचा नवा भासतो...
चंद्र रोजचा नवा भासतो...
कधी जाणून घेतली का?
त्या सागराची कथा
गुज ऐकू येते रातदिन
अन् खोल पाण्यात दडवून
घेतली त्यांने त्यांची व्यथा ...
आतुरतो तो भेटण्या नदीला जरी
सांज येते मिसळूनी रंग त्याच्या उरी
सोबतीची वाळूही थांबते किनाऱ्यावरी
अन् तो फेसाळतो आदळूनी लाटा लाटावरी ...
कधी पोर्णिमा कधी अमावश्या
चंद्र रोजचा नवा भासतो
दूर जरी आसमंती तो त्याच्या इशाऱ्यावर
हा बेधुंद गातो उसळतो झुरतो मरतो ...
असेच असते जीवन नाही का? आपले
जे जवळ ते लपवून का दूर शोधतो
मृगकस्तुरी परी भावनांचा सुगंध
अन् आपल्या सुख दुःखाच्या
भरती ओहटीला कारण
दुर कुठचा चंद्र असतो ...

