STORYMIRROR

sandeeep kajale

Romance

3  

sandeeep kajale

Romance

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

1 min
993

धुंद चांदणं नभी पसरले

मोहाचे ते क्षण गहिवरले


आली घटिका आपल्या मिलनाची

कहाणी वर्णिली, या जुल्मी नयनाची


चोहीकडे दाटला गर्भ अंधार

रात्रीने गायला प्रणय गांधार


आसमंत सामावला तुझ्या मिठीत

ओढ वेगळीच वाटे आपल्या भेटीत


वाटत नाही आता कुणाची भीती

राहणार नाही, ओंजळ प्रेमाची रिती


आता उशीर नको, घे मला कवेत

अनुभवू दे ही उर्मी, तुझ्या सवेत


पदर निसटता घडी पडली साडीच्या नक्षीला

या पहिला रात्रीसाठी, चंद्र आहे साक्षीला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance