STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

3  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

चळवळीच्या नवयुगा।

चळवळीच्या नवयुगा।

1 min
1.2K


"चळवळीच्या नवयुगा"


हे आंबेडकरी चळवळीच्या नवयुगा।

घे कबुल करून,

माझे क्रातीकारी सलाम।


हल्ली रोजच होतायेत रे

या भारत भूवर

तुझ्या अस्मितेचे दमन

तू तोडलेली ती मनुवादाची,

मानव गुलामीची बंद बेडी

आज पुन्हा हे शिक्षीत,

उच्च शिक्षीत, वापरू लागले आहेत

परंपरा,संस्कृतीच्या नावाने।


हे आंबेडकरी चळवळीच्या नवयुगा,

तु केलेली रक्तविरहीत क्रांती विझू नये।

माणसाने माणुसकीला काळीमा फासू नये

म्हणून आज पुन्हा गरज आहे

झालेल्या क्रातीच्या प्रतिक्रांतीची ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational