चला पंढरीसी जाऊ
चला पंढरीसी जाऊ
चला पंढरीसी जाऊ
विठू माऊलीसी भेटू
पुण्य दर्शनाचे घेऊ
सुख माहेरचे लुटू
वारकरी मुक्त नाचे
मुखे नामगजराते
टाळ चिपळ्या गजर
डुले मन भक्तीनादे
चाले अश्वाचे रिंगण
येता तरडगावासी
दिसो वाट पंढरीची
आस मम अंतरासी
वैष्णवांचे वाळवंट
भक्तीचाच महापूर
आस भक्तीची मनात
भक्तीभावे भरे ऊर
करी चंद्रभागा स्नान
पाप झडून जातसे
आस दर्शनाची लागे
जीव आतुर होतसे
रुप साजिरे गोजिरे
हात ठेवी कटीवरी
भावभोळ्या भक्तांसाठी
युगे उभे विटेवरी
