चला जयंतीला...
चला जयंतीला...


चाल : बडी मस्तानी है, मेरी महेबुबा...
अण्णाभाऊंची जयंती आज, चला करुनी शृंगार साज
चला जाऊ जयंतीला, चला सारे चला...।।
नाचू गाऊ सारे या शुभदिनी
अण्णाभाऊंची गाऊया गाणी...२
ढोल ताशांच्या या गजरांनी
गेलं अस्मान हे दणाणुनी...२
या रे सारे या, सामील सारे व्हा, मिळून आज सारे चला... चला जयंतीला...।।
नाही तरली पृथ्वी शेषावर
आपण तारली ती या हातावर..२
दीन-दलित, बहुजन, कामगार
आहे पृथ्वी यांच्या तळहातावर..२
सांगण्या हे अण्णा जन्मा आला, साऱ्या या जगाला...।।
चला जाऊ जयंतीला, चला सारे चला..
किर्ती अण्णाची साऱ्या या जगात
साहित्यरत्न ते साहित्यसम्राट..२
आज जयंती माझ्या अण्णाची
महान शाहीर तो शाहीरात..२
वंदू अण्णाला, बंधुंनो चला, बंधूभगिनी सारे चला, चला जयंतीला...।।