चिऊताई
चिऊताई
छोटीशी चिमणी अंगणात
माझ्या यायची
चिव चिव करत दाणे ती टिपायची
एक घास काऊचा एक घास चिऊचा म्हणत
आई घास भरवायची
रम्य बालपण सुखाचा
तो काळ अंगणात
चिऊताईची सोबत रोजच असायची
सकाळ होताच चिऊताई ची रोजची धावपळ मला दिसायची
या घरातून त्या घरात तेही न दमता ती कधी खिडकीतून डोकावून तर कधी
दोरीवर अगदी शांतपणे झुलत राहायची
चोचीने काडीकचरा वेचून सुंदर घरटे ती बनवायची
ठेवुनी मग घरट्यात आपल्या चिमुकल्यांना भरारी घेत चोहीकडे एकेक दाणा ती जमा करून पिल्लांना भरवायची
ऊन, वारा, पावसापासून रक्षणार्थ त्याच्या सदैव तटस्थ उभी असायची पंखात बळ येईपर्यंत
पिल्लांना न चुकता
दाणापाणी देत काळजी त्यांची घायची. ही मनमोहक दृश्य मनाला माझ्या सुखावून जायची....
बालपण चिऊताईच्या गोष्टीमुळे कधी तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले कळलच नाही
कुठे हरवली....? ती चिमुकली चिमणी अंगणात चिवचिवाट करणारी इवल्याश्या चोचीने दाणे वेचत थवा करून राहणारी...
एकजुटीचा संदेश देणारी.... पुन्हा तशी कधी दिसली नाही
घातक लहरींच्या मोबाईलमुळे
चिवचिवाट गडप झाला..?
प्रमाणात वापर करावा लागेल मोबाईलचा सगळ्यांना
तेव्हाच वाढेल वावर अंगणात चिमण्यांचा अन्
शक्य असल्यास तप्त उन्हात माडीवर ठेवू या दाणा पाणी
बालकांनाही कळेल मग चिऊताई अन्
तिची कहाणी....🙏😊
