STORYMIRROR

sarika k Aiwale

Inspirational Others

3  

sarika k Aiwale

Inspirational Others

चित्त माझे तुझ्या ठायी

चित्त माझे तुझ्या ठायी

1 min
182

तूच माझ सर्वस्व ही

चित्त माझे सर्व काही

जग माझे दुजे नाही

आत्म्याने देते ग्वाही 

चिता सजली देहाची

मन: शांती कुठे पाही

प्राण मातीमोल झाला

अनमोल ठेवा स्याही 

मन माझे  रमतेही

क्षण एक उरतोही

मनी भरे गंधाळीही

देह यातना त्या साही

वाही देवा तुझ्या पायी

चित्त माझे सर्व काही

एक दर्शनाची आस

नाही स्वार्थ दुजा काही 

चाले दिंडी अयुष्यात

भाव जपला भोळाही

दुख आल सुख गेल

संगे नित्य सावळाही 

आज पंढरीत तुझ्या

मन गेले असे काही

एक तूच सर्वकाही

ग्वाही देतसे आत्माही....

आज जाणिले तुलाही

तुला सत्य मानिलेही

डोळा मन प्राणातही

बघ छबी तुझी लिही... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational