STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract Romance

3  

Gangadhar joshi

Abstract Romance

चित्रपट गीत

चित्रपट गीत

1 min
259

पोरी तुझ्या नादान नादान 

निस्ता झालो मी हैराण  ।। धृ ।।


तुला धरू मी कुठं 

    सांग बोलु मी कुठं

जीव झालाय बेभान    ।। १।।


तुझं डाळिंबी व्हट

  गाली केसांची बट

तुझी चाल वैराट 

   बघून काळीज हे तुट

याड लागलं खुळ शिरलं

  तुझ्या अश्या वागण्यान  ।।२।।


तुझा रेखीव बांधा

   तुझा अटकर खांदा

गच्च धरून बस 

   नाही येणार वांदा

जीव पिसाट ला

   जीव सैराट ला 

 तुझ्या हसण्यान     ।। ३।।


तुझ्या नजरेचा भाला

  माझ् काळीज तुटला

मुरकण्याने तुझ्या 

    जीव कासावीस झाला

सांगु मी कसा

    बोलु मी कसा

 जीव ह्यो झुरणीला      ।। ४ ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract