STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Children

3  

Nurjahan Shaikh

Children

चिमुकल्यांची सहल

चिमुकल्यांची सहल

1 min
195

अशी एकदा सहल 

आमची ही गेली होती, 

विज्ञानाची ती सहल 

फारच गमतीशीर होती


मुलामुलींच्या रांगा तपासून

शिक्षकांची पंचायत होई

मोजून संख्या मुलांची

शिक्षक येती डबघाई


बसचा प्रवास, मुलांचा त्रास 

मध्येच कोणी रडे उगाच,

चिमुकल्यांची सहल येई नाकी नऊ 

गंमत सोडून झाली शिक्षा मलाच


नाचून, बागडून, गाऊन झाले, 

तरी न समजले छोट्या मनाला

काय आहे रहस्य विज्ञानात,

माहिती ना कळाली कुणाला


खाऊन, पिऊन झोपी गेले,

पाहून त्यांचे सुंदर चेहरे,

कशी ही असू दे माझी सहल

दिवस आठवणीत राहील सदा रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children