STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

4  

Smita Murali

Inspirational

चिमुकली भुक

चिमुकली भुक

1 min
253

देवबाप्पा देवबाप्पा 

नको ना रे जाऊ

बघ कसा खातो मी

जमिनीवरचा खाऊ


भुक मला लागली

आता खूप जाम

तुझ्या मागे येतो मी

थोडा आता थांब


तुला बाबा मिळतात

गरम गरम मोदक

खातो मी शिळेपाके

भुकेलेला मी बालक


पोटाच्या आगीपुढे का

लाजून कधी चालतं

मी राहिलो उपाशी तर

सांग कुणाचं काय जातं


मी आहे छोटा गडी

खाऊ खातो असा मस्त

तुझ्यामुळे मिळाला खाऊ

बाप्पा तुच खरा दोस्त! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational