STORYMIRROR

Sapana Thombare

Inspirational Others

3  

Sapana Thombare

Inspirational Others

चिमणीचे घरटे

चिमणीचे घरटे

1 min
275

झाडांवरती संसार तू मांडला

 त्या घरट्याची तू रानी गं


 चिमणी चिऊताई नाव तुझे

 चोच छान तुझी दिसते गं 


डोळे गोल तुझे छोटेसे

 रूप आकर्षक दिसते गं


 गवत गोळा करूनी थोडे थोडे

 फांदीवर खोपा तू बनवते गं


दाणा वेचून चोचीने खाऊन

 पाणी नदीवर जाऊन पिते गं


 पक्षी रुपात जन्माला येउनी

 जंगल तुझे राज्य आहे गं


 पिलांसाठी वणवण फिरुनी

 चोचीत दाना धरुन आणते गं


 आकाश वारा झाडांशी नाते तुझे

 पंख खोलूनी उडत असते गं


 कवी - सपना पंकज ठोंबरे  वाशीम 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational