STORYMIRROR

SWATI WAKTE

Classics

3  

SWATI WAKTE

Classics

चिमणी

चिमणी

1 min
363

कुठे हरविली ती चिमुकली चिमणी

अंगणात गाणारी चिऊ चिऊ गाणी

इवल्याश्या चोचीने वेचणारी दाणी

थवा करून राहणारी चिमुकली चिमणी

एकजुटीचा संदेश देणारी वाणी


आम्ही म्हणत होतो तिला चिऊताई

तिच्या आवाजाने सुरु होई आमुची घाई

न चुकता टाकी दाणा पाणी आई

फस्त करी थव्याने लगेच आमुची चिऊताई


चोचीने आणि काडीकचरा वेचुनी चिमणा चिमणी

सुंदर असे घरटे बांधी घरात आणि

इवलेशे पक्षी ठेवी घरट्यात चिमणा चिमणी

भरवी त्यांना चोचीने दाणापाणी


पंख फुटल्यावर पिल्लू घेई भरारी

पारखे झाले हे सर्व आमुच्या दारीं

गवसेल का परत आम्हा चिऊताई न्यारी?

तिला शोधतो आम्ही दारोदारी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics