छत्रपती शिवराय
छत्रपती शिवराय
महाराष्ट्राचा जाणता राजा
राज्यात सुखी होती प्रजा
थोरा मोठयांचा आदर
कलावंताची होती कदर
जाती धर्माला ना थारा
माणुसकी हा धर्म खरा
महिलांचा होय सन्मान
वैऱ्याला करीती शासन
शिस्तीत नसे तडजोड
सर्व मावळे होते निर्भीड
बालपणी घेतले युध्दाचे धडे
नाव ऐकूण शत्रूचे हृदय धडधडे
शिवाजी महाराजांची किर्ती जगात
जोवर सूर्य चंद्र आहेत आकाशात
