STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

छत्रपती शिवाजी महाराज - पाळणा

छत्रपती शिवाजी महाराज - पाळणा

1 min
16.3K


१६२७ला शिवनेरी किल्ल्याला

बाळ शिवाजी जन्माला आला

धरती मातेला आनंद झाला जो बाळा जो जो रे जो।।१।।


तेजस्वी चेहरा पाळण्यात दिसला

उद्धार करण्या आला जन्माला

तेजस्वी बुद्धी चपळ झाला जो बाळा जो जो रे जो।।२।।


हळूहळू बाळ वाढू लागला

जिजाऊचे संस्कार लाभले बाळाला

अंगात जोश चढू लागला जो बाळा जो जो रे जो।।३।।


दादोजी कोंडदेव होते संगतीने

शिवाजीस दिले लढाईचे शिक्षण

लहान वयात बाळ महान जो बाळा जो जो रे जो।।४।।


मुघलशाहीचा काळ भयंकर

रयतेला जगणे झाले गंभीर

बाळ शिवाजीने दिला आधार जो बाळा जो जो रे जो।।५।।


संगतीला घेतले मावळे सरदार

मुघलशाहीस केले जर्जर

अत्याचारावर केला तो वार जो बाळा जो जो रे जो।।६।।


साऱ्या महाराष्ट्रात घोडदौड केली

शाहिस्ते खानाची बोटे छाटली

शनिवार वाड्यात फजिती केली जो बाळा जो जो रे जो।।७।।


तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे जोडीला

राजांसाठी त्यांनी प्राण अर्पला

दिला विश्वास त्यांनी रयतेला जो बाळा जो जो रे जो।।८।।


राजे शहाजींचाचा पुत्र तो थोर

बहुजनांस लाभला वीर

मुघलशाहीस केले जर्जर जो बाळा जो जो रे जो।।९।।


आग्र्याची सुटका औरंगजेबाची हार

पेटाऱ्यातून झाले पसार

मावळ्यांचे बळ, कुशल सरदार जो बाळा जो जो रे जो।।१०।।


हिंदवी स्वराज्य स्थापन केले (१६७४ राज्यभिषेक)

बहुजनांचे राज्य ते आले

कुशल प्रशासन रयतेला लाभले जो बाळा जो जो रे जो।।११।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational