छोटा जीव
छोटा जीव
इवलेसे मन इवलासा जीव
घरास ठेवे नेहमी सजीव
हसताना घर जाई खुलून
प्रत्येक टाके जीव ओवाळून
दमले भागले जरी असले
बघून मन आनंदाने नाचले
बोलक्या वाटतात साऱ्या भिंती
छोट्याची आहे मोठी महंती
दिवस पटापट निघून जाई
कौतुकाने त्यास न्याहळी आई
