STORYMIRROR

Chandanlal Bisen

Abstract

3  

Chandanlal Bisen

Abstract

छंद तुझा गं जडला

छंद तुझा गं जडला

1 min
191

कविते तू मध्यंतरी

आयुष्यात माझ्या आली

जीवन सफल झाला

छंद तुझा गं जडला..1


स्वप्न बघितले होते

माझ्या हृदयी येशील

स्वप्न यशस्वी जाहला

छंद तुझा गं जडला..2


तुझा होता लळा मनी

 हृदयाची सम्राज्ञनी

आकर्षण तूझे मला

छंद तुझा गं जडला..3


तू किती गोड कविता

तुजविण रमे मन

तूझ्या स्वरूपी भुलला

छंद तुझा गं जडला..4


तू प्रेरणादायी मज

तूझे शब्द स्रोत मज

विसरू कसे तुजला?

छंद तुझा गं जडला..5


वेळेचे न भान मला

रमतो स्वरूपी तुझ्या

जीव बंदिस्त जाहला

छंद तुझा गं जडला..6


तुजवीन न किनार

जीवनास न झालर

जीवनी आकार दिला

छंद तुझा गं जडला..7


वळण मिळाले मस्त

कार्यात सदैव व्यस्त

धार चढे लेखणीला

छंद तुझा गं जडला..8       


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract