STORYMIRROR

Meera Mahendrakar

Abstract

3  

Meera Mahendrakar

Abstract

छंद माझा

छंद माझा

1 min
0

कधी कोण जाणे मी मलाच शोधले

 कविता लिहिण्याच्या मोहात फसलें 


मनातले भाव ओठावर आणले

शब्द, यमक जोडत ओळही लिहिले


मुक शब्दांना कल्पनेत मांडले

काव्य माझे आपोआप सजीव झाले 


रचनात्मक लिखाण बोलके रचले 

कलेच्या जगात संपूर्ण रमले


लिहिता लिहिता अनेक प्रश्न पडले

अनुभावाचा जोड़ीने उत्तरही सापडले


भावनात्मक लिहितांना अश्रु ओघळले 

तर रंजक लिहितांना स्वतः च हसले


काव्याच्या जगात पूरेपुर गुंतले 

शब्दाच्या किमयेत भान हरपले


कलेचे जग मग आवडू लागले 

हिच आवड माझा छंद बनले


शेवटी काय तर,


कधी कोण जाणे मी मलाच शोधले

कविता लिहिण्याच्या मोहात फसलें 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract