छळणे काही संपत नाही
छळणे काही संपत नाही
साथ नको तुझी जन्मोजन्मी
सहनही मज होत नाही
ब्रेक अप झालाय कधीचाच
लास्ट सीन बघणे मात्र टळत नाही
दूर जाऊनही दुरावा नसावा
प्रेमाचे हे गणित कळत नाही
मॅसेज कधीच टाईप केलाय भराभर
सेंड बटनाकड बोट वळत नाही
बोलताना शब्द फुटेना
डोळयातल्या भावना अडत नाही
आठवणींची साठवते वाळू
हाती काही उरतं नाही
मनोरथ कोसळले पुन्हा पुन्हा
धीर मनाचा ढासळत नाही
क्षणात काहूर दाटतो ऊर
मनाची वीण तूटत नाही
प्रेम संपले
संपला संवाद
आठवणींचे छळणे संपत नाही
