STORYMIRROR

Kishor Gaikwad

Romance

2.4  

Kishor Gaikwad

Romance

चेहरा तुझा हसरा

चेहरा तुझा हसरा

1 min
19.6K


 

पावसाच्या सरींमधून ओझरतो

आठवणींचा झरा

थेंबाथेंबा मधून बहरतो  

चेहरा तुझा हसरा

गर्द वनांमधुन शोध घेतसी

निघतो मनाचा पसारा

थेंबाथेंबा मधून बहरतो

चेहरा तुझा हसरा

केसांमधे तुझ्या किती

 शोभतो गजरा

थेंबाथेंबामधून बहरतो

चेहरा तुझा हसरा

अजून ही शोधतोय तुझ्या माझ्या

सोबतीचा किनारा

थेंबाथेंबामधून बहरतो

चेहरा तुझा हसरा

पावसाच्या सरींमधून ओझरतो

आठवणींचा झरा

थेंबाथेंबामधून बहरतो  

चेहरा तुझा हसरा

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance