STORYMIRROR

Sandhya Bhandwalkar

Inspirational

3  

Sandhya Bhandwalkar

Inspirational

चैत्रपालवी

चैत्रपालवी

1 min
307

आला आला चैत्र,

घेऊनी गुढीपाडवा,

नवीन पालवी,

नवा हा गोडवा... 1


नव वर्षाची झाली सुरुवात,

उन्हाळ्यात सुखद गारवा,

अंगणी सुखाची बरसात,

आला चैत्र हा हिरवा... 2


फुटली झाडांना नवती,

बहरली फुल वेली,

नवा मोहोर हा आला,

धरती नवी नवरी झाली... 3


गोड सणाचा गोडवा,

असा हा सुंदर मास,

नवीन जन्म त्यात,

असे नव पालवीचा सुवास... 4


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational