चैत्र मनोहर
चैत्र मनोहर
चैत्र पल्लव कोमल पर्ण
हर्षाने भरे मन उदास जीर्ण !
भुरळ पडे पाहून हिरवा वर्ण
झालर किरणांची भासे जणू सुवर्ण!!
चैत्रातल्या या सोनप्रहरी
पक्षीही गुंजारव करी !
कोकीळ ही गोड तान धरी
मरगळ मनाची सारी सरी !!
उल्हास मन हे आल्हाददायक
नाचे फेर धरून सुखदायक !
मन उंच उंचच नभात जाई
मेघासह हलके मग होई !!
फिरूनी मेघासह वळावासंगे
गुलमोहरासह लाल लाल रंगे !
मातीच्या त्या सुवासासंगे
भिजूनी जाई मनमुराद अंगे !!
प्रसन्न चित ते होई दंग
ताल धरी ते जसा मृदंग !
फुलांचा ही मंद मंद सुगंध
मोहून टाकी होई बेधुंद !!
असा हा चैत्र कमाल
रंगाची उधळे धमाल !
लाही लाही उन्हाचा दाह ही फार
कधी मधी बरसतो वळीव ही गार!!
