चारोळ्या
चारोळ्या
गुलाबच होता जो आपल्या
नात्याला गुंतवून ठेवत होता...
सुकल्या जीर्ण पाकळ्यांना
प्रेमाने कुरवाळत होता...
गुलाबाची प्रत्येक पाकळी
आठवण तुझी करत असते
म्हणूनच तुझी वाट पाहून
टवटवीत राहत असते...
गुलाबापरी तुझे शब्द
वेड लावतात रे मला
या वेड्या मनाचे प्रेम
कळेल का? कधीतरी तुला...

