चार लोकं बघतील...
चार लोकं बघतील...


सावकाराच्या घरी
लक्ष्मी जन्म घेणार
चार लोक बघतील
तर काय म्हणणार
चार लोकांच्या सांगण्यावरून
जन्माआधीच डोळे तान्हे मिटले
सहचारिणीही नाही सोबतीला
नाही ते चार लोक पुन्हा दिसले
काल भरलेलं घर माझं
आज चार उंदरांनी पोखरलं
पोखरणारी ती उंदरं कसली
पाखंडी मानवाचीच जात होती
बोलून पाखंडी पसार झाले
मती तर माझीच भ्रष्ट होती
ऐकून गाजावाजा चार लोकांचा
जग माझे शून्यात विलीन झाले