चार जून(4)
चार जून(4)
चार जून(4)
पाचवा लॉकडाऊन
चौथा दिवस सुटकेचा श्वास देणारा...!
चौ का चौकात चर्चा
था रा न देता रंगत होती
दि वसाच्या उच्छादाची
व ल्गना सारखी होत होती....
स गळे अवसान एकवटून
सु टीकेची प्रार्थना
ट वाळखोरही करत होती
के सालाही धक्का न लागता वेळ सरत होती...
चा वट वारा मात्र भीती
श्वा स रोखण्यास लावत होता
स मजून उमजून उगाच
दे दणादण धक्के देत होता....
ना मात ताकद मोठी
रा माने दाखवून दिले
जाता जाता रक्षण मात्र
प्रभूने छान केले....
गेले वादळ
थोडी मजा करून
उरले आत्मियतेचे बळ
पुन्हा संकटाला पुरून....!
सुप्रभात...!