चाफा बोलेना
चाफा बोलेना
मनात राहिली ही खंत
तुझ्या विचारांविना नाही उसंत
वाटते काही सांगायचे राहिले
जीवनात आनंदी क्षण नाही पहिले
भावना होत गेल्या किती रुक्ष
उन्मळून पडला आठवणींचा वृक्ष
आपल्या प्रेमाचे असे अवशेष भग्न
तुझ्या विरहातही, तुझ्यातचं मग्न
ऐ सखे, हा दुरावा कसा टाळू
शब्द असूनही मौन कसे पाळू
जन्मभर असावी तुझीच साथ
कायम हवा, तुझ्याच आधाराचा हाथ
मनात अनेक गोष्टी, तरीही हे खुलेना
कसे उमलले हे, काहीच चाफा बोलेना

