STORYMIRROR

Rohit Khamkar

Fantasy Inspirational Others

3  

Rohit Khamkar

Fantasy Inspirational Others

चांदण्यात न्हाहताना

चांदण्यात न्हाहताना

1 min
116

आज अचानक शांत, काळरात्र पाहताना

आठवती सारी स्वप्ने, चांदण्यात न्हाहताना


थकलो रडलो कितीदा, एकट्यात चालताना

दिसले काय काय ते, रडक्या डोळ्या पाहताना

काय काय सांगू अन किती लिहू, असे काही जगताना

आठवती सारी स्वप्ने, चांदण्यात न्हाहताना


स्वप्नांची सारी गाणी, मी मनसोक्त गाताना

सोडून सारी माझी, एकट्याला असे जाताना

जगणे एकाकी काय ते, एकट्याने ते जगताना

आठवती सारी स्वप्ने, चांदण्यात न्हाहताना


जडल्या कितीही असो त्या, कठोर यातना

त्यांना कोण विचारी, असो काही जातना

कित्येकांनी केला इथे, सोबत्याने घातना

आठवती सारी स्वप्ने, चांदण्यात न्हाहताना


झाली घाई इथे, वाऱ्यालाही वाहताना

काय सांगावी ती व्यथा, जगणाऱ्या सार्यांना

होऊ दे कितीही हल्ला, तमा नाही माऱ्याना

आठवती सारी स्वप्ने, चांदण्यात न्हाहताना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy