STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

चांदण्यांची वाट

चांदण्यांची वाट

1 min
164

चांदण्यांची वाट माझी

दैवदत्त लाभलेली

विहरते सुखेनैव

सुखभारे नाहलेली


खाचखळग्यांची रास

असो मधे पेरलेली

तमा त्यांची नसे मज

चांदण्यांनी भारलेली


सुखदुःखे आली गेली

मन नाही बिचकले

सम समान मानले

नाही त्यात अडकले


चांदण्यांच्या वाटेवरी

मम भेटीस चंद्रिका

सूर मिळाला सूरास

लाभे संगीत दिपिका


चांदण्यांची वाट माझी

तेज झळके अंबरी

मार्ग जरी अजाणता

ज्योत्स्ना फुलली अंतरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract