Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

चालीरितींविरूद्ध विद्रोह

चालीरितींविरूद्ध विद्रोह

1 min
14.5K


जाळून टाकावी बाईपणाची जात

बाईनेच हाणावी चालीरितींना लाथ

मोडून टाकावी जूनी व्यवस्था

निर्माण करावी स्त्रियांसाठी संस्था


कोण तू, आम्हांला बोलणारा ?

आमच्यावर ताशेरे ओढणारा ?

स्त्रीनेच का पाळाव्यात रिती ?

नको आता परंपरेची भीती


हरामखोर रिवाजांचा रोज बाजार

कोण आपले आणि कोण शेजार ?

तोडूनी, फोडूनी वाईट चालीरिती

निर्माण करायची नवी संस्कृती


नको ते फालतूचे उपवास

का भोगावा विधवेने वनवास ?

न्यायासाठी नाही करणार प्रतिक्षा

षंढ यंत्रणेलाच द्यावी शिक्षा


साले, रोजच सणांचे सोहळे

सर्वांना लागलेत भिकेचे डोहाळे

गलिच्छ, घाणेरड्या मोडूनी प्रथा

विद्रोह करूनी रचू नवी गाथा


कोण म्हणतो, वड पूजेला पावतो ?

विटाळातही आम्ही देवाला शिवतो

नाही येथे वाईट परंपरेची गटारगंगा

आडवा, तिडवा, कापूनी काढू माणूस नंगा




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational