चाहूल
चाहूल
तुझ्या येण्याची चाहूल
आता मला लागली
तुला भेटण्यास आतुर
अगदी वेडी मी झाली
तुझा अलवार स्पर्श
वेड ह्या जीवा लावते
नयनांनी तुझ्या माझ्या
प्रीत ही अपुली फुलते
तुझा गंध माझ्या मनात
नेहमीच असा दरवळतो
तुजवीण न राहता एकटी
उतावीळ हा जीव होतो
घट्ट धरूनी मला मिठीत
हृदयाच्या तारा छेडतात
मन उधाण वाऱ्याचे हे
तुझ्यातच हरवून जातात

