बुधवार सुप्रभात समय...!
बुधवार सुप्रभात समय...!
बु रखे अनेकांचे फाडावे वाटतात
ध वल यश पदरी पाडून घेण्यासाठी
वा ट लावावी वाटते
र डणाऱ्या आपमतलबी वृत्तीची
सू ड उगवावा वाटतो
प्र तापी अस्तनीतल्या सापांचा
भा गल्या गेलेल्या भाग्याला
त र्जनीने अलगद वर उचलावे असे
स काळी सकाळी वाटते
म य सभेची सारी लक्तरे
य दाकदाचित दूर सरतील
आणि
सौभाग्याची सर्व आभूषणे
लीलया लाभतील
याची खात्री आतवर कोठेतरी जाणवते
म्हणून
आजची सकाळ मला
खूप खूप छान वाटते..!
