बुध्दांचे तत्व
बुध्दांचे तत्व
दुसऱ्याचे दुःखा जीव तळमळला,
बुध्दांचे तत्वज्ञान देण्या विष्णु जन्मला.
सृष्टीत सृजनत्व अहिंसेतून फुलवला
स्वःशोधाच्या प्रकाशी जीव तेजाळला.
बुद्धांचे तत्वज्ञान विश्वकल्याण्याचे
मानवता, करूणा समान नैतिकतेचे.
ज्ञानज्योत सत्कर्म उजळविण्याचे,
पंचशील, अष्टांगिक ध्यान मार्गाचे.
दुःखाचे मुळसार भांडण,तंटचेे,
भेदभाव हाणामारीच्या तृष्णेचे,
बुध्दांचे तत्वज्ञान ते जग हिताचे,
अनुभवे ज्ञान ध्यान, तपश्र्चयेचे.
आचरू जीवन यशस्वी करणारे सार,
समंजस्याचे ठेवू आचार, विचार.
सोडू असत्य, हिंसा, व्यभिचार,
देशहिता षडरिपुंचा संहारू विकार.
