बुदधा
बुदधा
बुदधा तू मरणाचा आणि पूणरजनमच्या तत्वांचे सरळ साध विश्लेशन केलंस .पंचतत्वातुन जन्मलया देहाचं विघटन होऊन फिरून विलीन त्यातच होत सांगितलंस............................बुदधा तु माजवल नाहीस स्तोम कर्म कांडाच, दाखवलं नाहीस भय अस्तित्वितच नसलेलया नरकाच केल नाहीस आकंडताडव कलपनेतलया स्वर्गासाठी...............................बुदधा तु करूणामयी दुखांचे मुळ तु खरे जाणलेस .मानसाचा जन्म, मृत्यू आकलन तू वैज्ञानिक अंगाने मांडलेस ................ .......बुदधा तु प्रज्ञा, शील, करूणा देऊन आयुष्य मंगलमय केलेस प्रेम देऊन जगाला धन्य केलेस.................................युद्ध नको जगाला बुदध हवा असे सारेच म्हणतात.तुझ्या अमृत वाणीने विषारी शब्दही अमृतात परावर्तित होतात..................अंजली भालशंकर पुणे लेखिका पाऊस वेचताना काव्यसंग्रह
