बस्स एक कॉल
बस्स एक कॉल
रोज नव्याने उलगडत जाणारी आयुष्यरुपी पुस्तकाची पानं...
स्वच्छंदपणे विहरणाऱ्या वाऱ्याचं मंद पण तरीही हवंहवंसं वाटणारं सुंदरस गाणं...
कधी ओठांवरचं कोमल , मंद हसू...
तर कधी अनाहूतपणे डोळ्यांत उभे राहणारे अश्रू...
अस्ताला जाणाऱ्या मित्रासोबत पानांची होणारी पडझड...
आणि या सगळ्यांमधून हळूच डोकावणारी जगण्याची धडपड...
अशातच अचानकपणे तुझा कॉल यावा... अन्..दिवसभराचा सगळा थकवा वाऱ्यावर विरून जावा..
