आई
आई
आईच्या केवळ सोबत असण्याने जीवनास येतो अर्थ..
अन् तिच्या नसण्याने अवघं जीवन वाटे व्यर्थ..
जपते ती लेकरांना.. जणू फुलाची पाकळी..
तिच्या नसण्याने निर्माण होते न भरून येणारी पोकळी..
लेकरांची छत्री होऊन ती झेलते ऊन, पाऊस, वारा.. तिच्याविना लेकरांना न मिळे कुठे थारा..
जीव तुटे तिचा लेकरांच्या मायेपोटी..
बंध घट्ट नात्यांचे हे अनंत जन्मांसाठी...
