आई हृदयाची स्पंदने
आई हृदयाची स्पंदने
शब्द दोन अक्षरांचा..
सामावून घेई विश्र्व सारे...
या शब्दासमोर फिके..
जणू अंबरातले तारे..
या शब्दाविना माणसाचे
जीवन होई रूखे रूखे..
या शब्दाशीच जोडलेली
माणसाची सुखदुःखे...
अर्थ येतसे आयुष्याला..
या शब्दाच्या अस्तित्वाने..
जगणे होते बेचव..
या शब्दाच्या नसण्याने..
जगण्याचे मोल वाढवी....
जो शब्द ठायी ठायी..
नच दुसरा कोणताही..
तो शब्द असे "आई"
