बाबांनी मला हेही शिकवलंय....
बाबांनी मला हेही शिकवलंय....


बाबांनी मला प्रिन्सेस नाही...
रणरागिणी बनवलंय....
स्वाभिमानाने फुलणारी...
एक सुंदर कळी बनवलंय...
हातात माझ्या टेडी नाही...
लेखणी दिलीय बाबाने...
जगावेगळं काहीतरी..करायला ...
शिकवलंय मला ...या वाघाने...
बाबा...
तुमच्यासाठी...मी नाही आणू शकणार...चंद्र तारे तोडून...
पण...नाही वागणार कधीच...मी तुमचा आदर्श सोडून...
तुम्हीच शिकवलंय...मला...
चालायला...आणि ...बोलायला...
पण का माहित नाही...
शब्दच नाहीत सापडत...तुमच्याबद्दल लिहायला....
तुम्ही बोलायला शिकवताना मला...
कधी माझे शब्द झालात...कळलेच नाही...
तुमच्याबद्दल लिहिताना मात्र...
शब्द माझे वळलेच नाहीत...
मोडक्यातोडक्या शब्दांची ही आरास ...
बाबा तुमच्यासाठी...
शब्दांत नाही सांगू शकत...किती खास आहात
तुम्ही...माझ्यासाठी....