Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreya Chougule

Tragedy Inspirational

4.2  

Shreya Chougule

Tragedy Inspirational

आयुष्याच्या संध्याकाळी...

आयुष्याच्या संध्याकाळी...

2 mins
305


आज वेगवेगळ्या समाजमाध्यमांतून आईबद्दलचे प्रेम उतू जाताना पाहिलं..

आई म्हणजे ...एक प्रकारची संरक्षक भिंत असते...

ती तळपत्या उन्हात ढाल बनून आपल्या मुलांच्या पाठीशी राहते...

आपल्या मुलांसाठी आपलं सर्वस्व वाहून देते...

तिच्यासारखं प्रेम कुणीच करू शकत नाही...

तिच्या ममतेचं वर्णन करण्यासाठी जगातल्या सगळ्या उपमा फिक्या पडतात...

वगैरे ...वगैरे...

अजून बरंच काही...


आणि मनात एकच वादळ उठलं... अनेक अनुत्तरीत प्रश्नांनी मनात काहूर माजवलं...

एवढंच जर प्रत्येकाचं आपल्या आईवर प्रेम असतं...

तर मग दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढतेयच कशी...???

जी आई आपल्याला आपण कितीही मोठे झालो तरी सांभाळत असते...

त्याच *आईच्या आयुष्याच्या संध्याकाळी ती नकोशी का वाटते...???*


आज मातृदिन आहे म्हणे...!

म्हणजे काय...तर...आईचा दिवस म्हणे...!

अहो...संपूर्ण वर्षात असा एकतरी दिवस आहे का...ज्या दिवशी आपल्याला आईची गरज पडत नाही...???

साधी ठेच लागली तरी पहिल्यांदा आईच आठवते...

मग *तीच आई आयुष्याच्या संध्याकाळी नकोशी का वाटते...???*


लहानपणी ...आपल्या आजारपणात कित्येक रात्री तिने जागून काढल्यात...

तिचा सगळा वेळ तिने फक्त आपल्यासाठी खर्च केलाय...

आपलं खाणं-पिणं... औषधे ...हे सगळं करताना ती स्वतःचं अस्तित्वसुद्धा विसरून गेली होती....

पण आज...ऑफिसवरून घरी परतताना आपण अगदी सहजच

तिची औषधं विसरून येतो...

खरंच... *आज आयुष्याच्या संध्याकाळी ती नकोशी का वाटते...???*


लहानपणी आपली शी - शू सगळं काढलंय तिने...

तेही अगदी आनंदाने...

कुठल्याही प्रकारचा किळस किंवा तिरस्कार न बाळगता...

पण आज तिला आलेली खोकल्याची उबळ बघून नाक मुरडताना काहीच वाटत नाही आपल्याला...

का...???

*का आयुष्याच्या संध्याकाळी नकोशी वाटते ती...???*



आपल्या उत्तुंग यशासाठी तिने खाल्लेल्या खस्ता आठवत नाहीत आपल्याला...

आपल्या गरुडभरारीसाठी तिने पंखांत भरलेलं बळ आज व्यर्थ वाटतं आपल्याला...

आपल्या भविष्यासाठी तिने पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा होत असतो...तिच्या डोळ्यांसमोर....

पण तरीही आपल्या उन्नतीसाठीच झटत असते ती नेहमी...

मग...

हीच आई ... *आयुष्याच्या संध्याकाळी नकोशी का वाटते...????*



मित्रांनो... स्टेटस वरून आईवरच प्रेम व्यक्त होत नसतं...

तिच्या आवडीनिवडींची काळजी घ्या...

तिच्या उपकरांची परतफेड नक्कीच नाही होणार...

पण...तिच्या हातांचा कोमल स्पर्श... तुम्हाला नक्कीच स्वर्गसुख देऊन जाईल....

'माँ के चरणों कि जन्नत' अनुभवायची असेल तर...

फक्त तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिला एकटं सोडू नका...

लहानपणी तिनेच तुम्हाला चालायला शिकवलंय...आज आयुष्याच्या संध्याकाळी... तुम्हीच तिचे *पाय* व्हा...

तुमच्या या आईची ...आता तुम्हीच माय व्हा...


Rate this content
Log in