Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shreya Chougule

Classics Others

4.1  

Shreya Chougule

Classics Others

ओढ पावसाची...

ओढ पावसाची...

1 min
209


थोडीफार का होईना पावसाची ओढ असतेच प्रत्येकाला...

कुणाला नाही आवडत सांगा चिंब चिंब भिजायला...


चिंब चिंब भिजताना भान हरपून जातं...

पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत... वय विसरून जातं...

कागदाच्या होड्या... पाण्यात सोडताना...

निरागसतेचं प्रतिबिंब पावसातच मिळतं पाहायला...

कुणाला नाही आवडत सांगा... चिंब चिंब भिजायला...


बळीराजाच्या डोळ्यांतून गळणाऱ्या आसवांसारखा...

एक एक थेंब टपकत राहतो...

टपकता टपकता... अश्रूंचंही अस्तित्व मिटवून जातो...

गळणाऱ्या छताला पातेल्यांची ठिगळं लावण्यात आयुष्य जातं सरून...

तरीही पावसाची आस असतेच बळीराजाला...

कुणाला नाही आवडत सांगा... चिंब चिंब भिजायला...


चिंब बरसणाऱ्या पावसात... दुःख सगळी वाहून जातात...

पावसाच्या थेंबांसोबत अश्रूसुद्धा पोहून जातात...

बरसणाऱ्या सरींची आपलीच एक अदा असते...

त्यांच्यात सामावताना अश्रू लागत नाहीत लपवायला...

खरंच... कुणाला नाही आवडत सांगा... चिंब चिंब भिजायला...


पावसालाही असतेच की हो... ओढ बरसण्याची...

धरणीमातेला भेटून... तृप्त होण्याची...

सगळे अश्रू तोही सांडून देतोच की...

ढसाढसा रडून तोही मोकळा होतोच की...

पण त्याच्या अश्रूंतूनच सुरुवात होते... नवजीवन फुलायला...

खरंच... कुणाला नाही आवडत सांगा... चिंब चिंब भिजायला...


पाऊस सगळ्यांसाठी असतो एकसारखाच... 

पण भिजणं मात्र वेगळं असतं प्रत्येकाचं...

त्याची कारणंही वेगळी असतात... प्रत्येकासाठी...

पण तरीही सगळ्यांनाच आवडतं... पावसाशी एकरूप व्हायला...

खरंच...

कुणाला नाही आवडत सांगा... चिंब चिंब भिजायला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics