बसची रांग
बसची रांग
बसमधल्या रांगेत
डोळ्यांना डोळे भिडले.
हृदयांतरीचे भाव
दोघांनाही उमजले
मुग्ध अबोल प्रीतीला
शब्द अजाणच होते
हृदयातील उर्मींना
ओठ अडवित होते
स्मित हास्य प्रेमिकांची
देवाणघेवाण होती
शेजारची सीट हीच
घोडदौड झाली होती
त्याच्याशिवाय कधीच
ती रांगेत थांबत नसे
ती आली नाही तर
तो मान वळवत असे
दोघे एकत्र बघून
आश्चर्यचकित सर्व
पेढे लग्नाचे देताना
मनी दाटला हर्ष
अभिनंदनाचा वर्षाव
आनंदोत्सव साजरा
लाजवंती चेहऱ्याला
तळव्यात घेई लाजरा
