STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

2  

Sarika Jinturkar

Fantasy Others

बरसल्या रेशीमधारा..

बरसल्या रेशीमधारा..

1 min
89

निळेभोर आभाळ 

आज दाटुनी आले 

मंद वारा सुटला अन् पावसाला उधाण आले  


बरसल्या सरसर रेशीमधारा  

हिरव्यागार पानांवर 

थेंब पावसाचे ओथंबले

 पंख पसरुनी पाखरे 

आनंदाने न्हाहले


मृदगंध पावसाचा दरवळला  

 रिमझिम सरींनी गाणे रचले 

 ढगाळलेल्या वातावरणात तार इंद्रधनूनी छेडले  


हिरवळ या झाडांची दाटली

 हर्षाने वसुंधरा हसली अन् सजली ही रानफुले  

 

 सुखद मंद वाऱ्यात 

काही क्षण शहारावे 

अशातच वीजेने आपले सूर नव्याने गायले 

निळेभोर आभाळ आज दाटुनी आले मंद वारा सुटला अन् पावसाला उधाण आले..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy