बरसल्या धारा
बरसल्या धारा
बरसल्या धारा
हर्ष झाला मनी
आयुष्यभर राहू
तुझे आम्ही ऋणी
तुझ्या येण्यामुळे
जागी झाली प्रीत
कृषकास मिळे
जगण्याची रीत
या तुझ्या येण्याने
सृष्टी ही सजली
पहिल्या धारेने
यौवना लाजली
मोर लागे नाचू
फुलून पिसारा
आनंदात आहे
आसमंत सारा
बरसत नाही
तू मेघ बनुनी
नयनी ह्या अश्रू
दुःख हे जाणुनी
भागत नाही ये
भिजण्याची भूक
माणूस करतो
वृक्षतोडीची चूक
आता तू बरस
विसरून सारे
वाहु दे मनात
प्रीतिचे वारे
