बरे नाही
बरे नाही
हास्यात गुरफटवुनी मला
नयनातील अश्रु पुसतेस
शब्दात अडकवुनी मला
माझ्या मनातील गुपित हेरणे, हे काही बरे नाही
गीत ओठी गुणगुणत
मला तर ती साद वाटते
शब्द ओठावर रेखाटतेस तू
नाव मला ते माझे वाटणे बरे नाही
हाती घेऊनी पैलू मनाचा
पाउल माझं वळवतेस तू
तुझ्या दिशांचा फाजील मार्गस्थ म्हणून
मला वळविणे बरे नाही

