STORYMIRROR

Prakash Chavhan

Children

3  

Prakash Chavhan

Children

बोरं प्रेमाचीच

बोरं प्रेमाचीच

1 min
293

अंबड झुंबड

आली या मनात 

बोरं पिकली बघून 

जीव ओढवतं खाण्यास


आंबट गोडीची ती 

लहान मोठ्यांची आवड

डोळे मिचून येई हर्षभाव

मजेने चव घेती तया


दरवळते प्रेम आपसात

देण्या घेण्यात ही बोरं

लागे मित्र जिवलग

बोरं खाण्या आनंद वेगळा


सय येते सय राहते 

मित्र सोबत्याचं सहवास 

झरोका सयाची दिसे बोरात 

पळभर मना डुबकी घेई त्यात


कधी मास्तरासाठी आणिले

कधी मास्तरीणसाठी 

रुची बोराची का असेना 

जवळ प्रेमानं बोलावती कुणीपण


म्हणून बोरं प्रेमाची 

राम शबरी माँ ची गोष्ट 

आठवली बघून बोरं 

हृदय उदार होतं तयानं


जुळती सूर मित्रत्वाचे 

आम्हा लहानपणी बोरानं 

स्वैर मारू शाळेच्या सुट्टीतं 

एकत्र जमवती आम्हा, 

अशी बोरं प्रेमाचीच...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children