बोंड आळी...!
बोंड आळी...!
बोंड आळी आली आली
शिवारात घाई झाली
औषधांची चणचण भासली
रडण्याची वाटत आली पाळी...!
जोमानं वाढलेलं पीक
म्हणे नियती विक
माग आता भीक
झालो पुरता सिक..!
काजवे चमकले
डोकेच फिरले
हातचे सारे सरले
म्हंटल काय उरले...!
बांदावर तो उभा होता
सारे पहात होता
आणि म्हणत होता
मी काय करू...!
मी म्हंटल आता
धावा तुझा नाही करणार
बघ असा नाही हरणार
तुला संकटा मी पुरुन उरणारं....!!!