बोल तूझे प्रित वेडे. ....
बोल तूझे प्रित वेडे. ....
ये पागल
का वागतोस वेडा पिसा
सायकल वरून हात
सोडून चालवतोस कसा
एकदातरी पडशील
घटारात बुडशील
येवढ्या चक्करा मारून
मिळते तरी काय?
दुरून पाहून दूरून जाण
तूझ रोजच हे हाय
वाकडी वाकडी मान
वळवत नको हेरत जाऊ
धडपड तूझ्या प्रेमा कशी मी पाहू
जिथे तिथे
माग येणे ओरडून बोलत राहण
जवळ आहे हे नको सांगू
माझ्या ह्दयांची धडधड तूच जणू
जसे भिरभिरणारे पाखरू तू
दिसेनासा झालास तरी तू दिसावा
नाही पुन्हा आलास त्या रस्त्याने
तो रस्ता भकास व्हावा
असा चोरून पाहतोस आणि
मंद गतीने धावतोस
ओल्या ओल्या पाऊसांच्या
थंबात वेड्या तू आणि तूच
जाणवतोस
तू असा वागतोस वेडा पिसा
म्हणून आवडला सजन असा....

