बोल कोरोना
बोल कोरोना
बोल करोना बोल आता
तू जाणार की न्हाय
अजून तरी तुला रे
किती बळी पाहिजे हाय
तुझ्या नावाची दहशत पसरली
काळजात रे धडकी भरली
अशी मनात तुझी भीती शिरली
जीवाची सोय न्हाय राहिली
सारे जग रे हैराण झाले
हात जोडून विनवू लागले
तुला दया त्यांची का येईना
असे काय भयान हे घडले
रक्ताची माणसे दूर केली
कोणी कुणाला विचारीना झाली
अशी वाईट अवस्था केली
त्यांची माणूसकी कुठे गेली
बोल कोरोना बोल आता
तुझे असे किती दिवस चालायचे
गोरगरीबांचे हाल आता
किती दिवस आम्ही पहायचे
निघून जा तू एकदाचा
करतो आम्ही आता लसीकरण
तुझ्यातली भीषणता जाऊ दे
नको देऊ कुणासही मरण
आशेचा एक किरण दाखव
कर जगाला यातून मोकळे
पुन्हा पुर्वपदावर येऊ दे
जीवनव्यवहार मानवाचे सगळे
लोकांचे काम धंदे बुडाले
महाउपासमारी ने लोक गेले
घरातच तू कोंडून ठेवले
बाहेर मास्क लावण्यास लावले
अशी कशी रे तुझी शिक्षा
आम्ही किती दिवस भोगणार
मोकळा श्वास घेण्याची
आम्हांला संधी कधी मिळणार
कायदा सरकारचा आम्ही पाळतो
सहकार्य सरकारला करू
सांग कोरोना सांग आम्ही
कोरोना मुक्त केव्हा होऊ
स्मशानतही तू गेला
मानवाचा अंत तू केला
असा कसा रे तू कोरोना
माणसाला भस्मसात केला
