STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

बोल अनुभवाचे

बोल अनुभवाचे

1 min
227

अनुभव संघर्षातून जगणाराची साथ असावी 

अनुभवाचे बोल ही विश्व प्रेरणा जगाला मिळावी 

अनुभव असतो महागरू,जगताना त्याची मैत्री करावी

अनुभव कुसंगातून बाहेर काढतो,सत्संगाशी गाठ पडावी 


अनुभव गरीबीचे शिक्षण देतो अनुभव असावे प्रभावी 

अनुभव जगण्यातली माय असते ही शिकवण द्यावी 

अनुभव नियोजन करायला शिकवितो ही शिदोरी समजावी 

अनुभव जगायला शिकवितो ही गुरुकिल्ली जतन करावी 


अनुभव चांगले वाईटाचे आत्मपरीक्षण सतत शिकवी 

अनुभव रक्ताचे अनुभव कृतीतून जगासमोर दाखवी 

अनुभव नित्य घेतच रहावे, दुसर्याना ओंजळभरून द्यावी 

अनुभव दु:खावर वार करणारी अखंड शस्र तयार व्हावी 


अनुभव जगण्यातली एक महान उमीद समजावी 

अनुभवाने ताणतणाव दूर करण्याची गुरू दिक्षा द्यावी 

अनुभव संस्काराची,संस्कृतीची जतन करणारी जननी असावी 

अनुभव बाह्य जगाचे ज्ञान देणारी फार मोठी विद्यापीठे व्हावी 


अनुभव अडाणी माणसाला सुधरावणारी ज्ञानविश्व व्हावी 

अनुभवातून काटकसरीने जगण्याची दिशा मिळावी

अनुभवातून आयुष्याची सुंदर सुरुवात सर्वत्र व्हावी  

अनुभवाने परिवर्तनाची नवीन खूप मोठी लाट आणावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational