STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

बंधन प्रेमाचे

बंधन प्रेमाचे

1 min
641

बंधन प्रेमाचे

(अष्टाक्षरी)


बेलगाम उधळती

वारू चौखूर मनाचे

त्याला असावे लागते

एक बंधन प्रेमाचे।।१।।


कुणासाठी धडपड

झीज होतसे जीवाची

राब राबतो उन्हात

ओढ आपल्या व्यक्तींची।।२।।


गेला दूर किती जरी

येतो निश्चितच घरी

सारी किमया प्रेमाची

कशी मनाला आवरी।।३।।


जीव वेग वेगळाले

जरी जगात असती

वृक्ष वेली पशु पक्षी

सारे प्रेमाने नांदती।।४।।


प्रेम बंधन घराला

घट्ट बांधून ठेवते

घरातल्या सदस्यांना

एका माळेत ओवते।।५।।

.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational