बंध नाजुक
बंध नाजुक
माझ्या जीवनातले कोडे असे
मज अद्यापही सापडत नाही
कशी मिठी सैल झाली अशी
अजूनही मज उलगडत नाही.......
गुलाबी मनाची स्थिती माझ्या
खऱ्या प्रेमाचे देवून हे दाखले
कधी काय होईल या जीवनी
मज प्रितीचे रंग अनोखे भासले.......
प्रितिचा बंधनातून हे आयुष्य
काढले अन् काळजाने ते वेढले
बंध नाजुक कोमल असतात
मनाच्या धाग्याने मी ते विणले........
चंचल नयनांचा भ्रम असतो
चचंल वलये ही आयुष्यात
मिठी असावी मजबूत नेहमी
त्यात असावी विश्वात्मक जीत.......
सप्तरंगी रंगाच्या प्रितीची
अशीच असावी अदा न्यारी
जरी असले चौफेर वादळे
बांधुन मिठी चढावी पायरी.......
डोळ्यातील पाणी आवरून
पापण्याआड ही लपवायची
प्रित ही प्रथम फुलवायची
मग सैल मिठी घट्ट विणायची.........